खानापूर : जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील हे होते. यासाठी येत्या बुधवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या आमच्या हक्कासाठी मराठीत कागदपत्रांची पूर्तता करावी व मराठी फलक लावण्यात यावेत, यासाठी खानापूरचे तहसीलदार श्री. प्रवीण जैन यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले, तसेच यावेळी खानापूर समितीचे नेते उपस्थित राहणार आहेत. समस्त मराठीप्रेमी जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.
या बैठकीला कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, उपाध्यक्ष पिंटू नवलकर, विनायक सावंत, राजू पाटील, रामचंद्र गावकर, पांडुरंग ऱ्हाटोळकर, राजू कुंभार, प्रतीक देसाई, दिगंबर देसाई, महेश कदम, हनुमंत गुरव, लक्ष्मण पाटील, विशाल पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, विशाल बुवाजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta