Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात श्री सिध्दी ट्रेडर्सचे थाटात उद्घघाटन

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-हुक्केरी रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या श्री सिध्दी ट्रेडर्सचे उदघाटन उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती यांचे हस्ते फित सोडून करण्यात आला.

यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, श्री सिध्दी ट्रेडर्सने सर्व प्रकारचे लेटेस्ट टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट, सिरॅमिक उपलब्ध करुन नव्याने घर बांधणाऱ्या लोकांची उत्तम सोय केली आहे. आता बेळगांव कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता नाही. घर सजावटीसाठी लागणारे साहित्य श्री सिध्दी मध्ये मिळणार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते बसवराज बस्तवाडी यांचे हस्ते अप्पासाहेब शिरकोळी, पवन कत्ती यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत पुट्टराज हिरेमठ यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, शिवानंद नेसरी, नंदू मुडशी, अभिजित कुरणकर, बसवराज बागलकोटी, नगरसेवक रोहण नेसरी, डॉ. प्रशांत बस्तवाडी, अजय सारापूरे, सुधाकर शेट्टी, सागर जकाते, चेतन बशेट्टी, राजू गडकरी, अप्पासाहेब गस्ती अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राकेश हुद्दार, गोपाल खिद्रापूरे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *