Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूरात श्री गजानन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

Spread the love

पहिले बक्षिसे 1 लाख 21 हजार रू.
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील मलप्रभा क्रिडांगणावर श्रीमान गजानन गावडू पाटील पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा गुरूवारी दि. 3 रोजी आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या क्रिकेट संघाला पहिले बक्षिस 1 लाख 21 हजार रूपये व ट्रॉफी तर दुसरे बक्षिस 61 हजार रूपये व ट्रॉफी अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ दि सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना भाजपा तालुका सेक्रेटरी गजानन पाटील म्हणाले की, दुर्गम अशा खानापूर तालुक्यातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच 1 लाख 21 हजार रूपयाचे भव्य असे बक्षिस देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा खानापूर तालुक्यातील एक पंचायत व चार आयकॉन, खानापूर शहर ओपन व चार आयकॉन तसेच बेळगांव ग्रामीण, जोयडा तालुका, हल्याळ तालुका आदी संघांना खेळविण्यात येतील अशी माहिती दिली.
क्रिकेट स्पर्धा उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल हे असून उद्घाटन भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते होणार. मैदानाचे पुजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन होणार आहे.
खानापूर तालुक्यातील क्रिकेट संघांना या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन पाटील व शंकर पाटील यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *