खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील असोगा येथील मलप्रभा नदी घाटावर खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्नानासाठी एकच गर्दी केली होती.
सकाळी आठ वाजल्यापासून भाविक मलप्रभा नदी घाटावर स्नान करून मलप्रभा नदीची पुजा, नैवेद्य दाखवून मनोभावे पुजा करत होते.
येथील असोगा हे पर्यटन स्थळ असुन येथे रामलिंगेश्वराचे प्रसिद्ध देवस्थान आहे. महाशिवरात्रीच्या सणानिमित्त येथे भाविकांची गर्दी असते. दरवर्षी महाशिवरात्रीला खानापूर बेळगाव तालुक्यातील भाविक मलप्रभा नदी काठावर नैवेद्य व महाप्रसादासाठी स्वयंपाकाचे आयोजन करत होते.
यावेळी यल्लम्मा देवीचे भक्त पडली भरण्याचा कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पुजेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती असते. यावेळी मलप्रभा नदी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.
सायंकाळी सात वाजेपर्यंत असोगा परिसात भाविकांची गर्दी होती. असोगा (ता. खानापूर) येथील रामलिंगेश्वर मंदिरामुळे हे ठिकाणाला प्रसिद्ध आहे. त्यामुळे बेळगाव खानापूर भागातील भाविक वर्षभर या ठिकाणी येतात. असोगा स्थळाला पर्यटनाचा दर्जा द्यावा, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta