खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी तालुक्यात पावसाचा जोर वाढला. तसेच तालुक्यातील नद्या, नाले, तलाव पात्रात पाण्याची पातळी वाढली. गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे गुरूवारी आंबेवाडी, किरवाळे गावच्या संपर्क रस्त्यावरील नाल्याच्या पूलावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.
त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे मुष्किल झाले आहे.
याच वर्षी ४० लाख रूपये खर्चून आंबेवाडी-किरवाळे-गुंजी रस्त्यावरील नाल्याच्या पुलाचे काम करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे पुलाची उंची वाढविली नाही.
त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा पाणी आल्याने संपर्क तुटला त्यामुळे ४० लाख रूपयाचा निधी पाण्यात गेला.
या भागातील नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराला पुलाची उंची वाढविण्यासाठी विनवणी केली. मात्र संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केले. त्यामुळे यंदाही पुलावरून पाणी वाहु लागल्याने ४० लाख रूपये खर्चून नागरिकांना काहीच फायदा झाला नाही. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून पैसा उचलल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
गुरूवारी संध्याकाळ पर्यंत पुलावरून पाणी जात होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …