खानापूर (प्रतिनिधी) : देशाची सेवा करून लष्करी अधिकारी सेवानिवृत्त होऊन मायदेशी परतले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा खानापूर तालुक्यातील मन्सापूर गावात ग्रामस्थांच्यावतीने नुकताच आयोजित करण्यात आला. यामध्ये निवृत्त सुभेदार व्यंकाप्पा विठ्ठल भोसले, निवृत्त हवालदार आंध्रू फर्नांडिस, किरण चौगुले, शिपाई पदावरून निवृत्त झालेले संतान बोर्झिस आदीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासु बापू चौगुले होते. तर व्यासपीठावर निवृत्त सुभेदार गोपाळ देसाई, कॅप्टन प्रकाश माळवे, निवृत्त सुभेदार राजाराम पाटील, निवृत्त सुभेदार नारायण झुंजवाडकर, निवृत्त सुभेदार शिवाजी चौगुले, विष्णु जळगेकर, ग्रामपंचायत सदस्य रिचर्ड अग्नेल मिनेजीस आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत विष्णू जळगेकर यानी केले.
प्रारंभी निवृत्त लष्करी अधिकारी वर्गाचे गावातून पुष्प उधळुन स्वागत केले. तर ग्राम पंचायत सदस्या सौ. छाया संदीप चौगुले यांनी आरती ओवाळून त्यांचे औक्षण केले. तसेच गावच्यावतीने निवृत्त लष्करी अधिकारीवर्गाचे शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त सुभेदार गोपाळ देसाई, नारायण झुंजवाडकर यांनी लष्करी अधिकार्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून देश सेवा हीच खरी सेवा याबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाला गावातील नागरिक आंतोन सोज, नारायण चौगुले, मारूती धामणेकर, मारूती चौगुले, बाळू चौगुले, दिपक भोसले, सागर भोसले, जोतिबा धामणेकर, लक्ष्मण धामणेकर, बाळू धामणेकर, आंद्रु सोज, गंगाराम चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विष्णू जळगेकर यांनी मानले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …