खानापूर : गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सव 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मराठमोळ्या वातावरणात गावातून शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमृत महोत्सवी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत गुरव, ग्राम पंचायत सदस्य अश्विनी देसाई, विठ्ठल हट्टीकर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक एल. डी. पाटील यांनी अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. श्रीकांत गुरव यांनी 2003 मध्ये शाळेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे हा कार्यक्रम देखील यशस्वी करण्यासाठी विविध समित्या नेमून कार्यक्रम यशस्वी करणे असे सांगितले.
पी के चापगावकर यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले. मिलिंद देसाई यांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या आवाहन पत्रिकेचे वाचन केले.
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य पांडू फौंडेकर, अर्जुन देसाई, नारायण जोगन्नावर, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई, माजी मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी, उमेश देसाई आदींनी विविध प्रकारच्या सूचना केल्या.
यावेळी शंकर अंग्रोळकर, महादेव जाधव, किरण पेडणेकर, माया कामती, अपर्णा जोगन्नावर, अनिता जोगन्नावर, वासुदेव तळवार त्यांच्यासह शाळेतील शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या कार्यक्रमानिमित्त रंगरंगोटी, डागजुजी यासह विविध प्रकारची कामे हाती घेतली असून कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या दिवशी भव्य शोभायात्रा काढली असून कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये सर्वांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …