तालुक्यात सर्व नद्या, नाले ओव्हरफ्लो; धोक्याचा संभव
खानापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाप्रमाणे यंदाही खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गुरूवारी पावसाचे प्रमाण अधिक वाढले त्यामुळे तालुक्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली. तसे मलप्रभा नदीवरील जुना पूलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे रामनगर, हल्याळ मार्ग पूर्ण पणे बंद झाला.
त्याचप्रमाणे मलप्रभा नदीघाट जवळील नविन पूल सुध्दा पाणी काठापर्यंत आले आहे.
त्यामुळे मलप्रभा नदीघाट जवळील राममंदिर, हेस्काॅम मंदिर, तसेच भट गल्ली पाण्याने व्यापले आहे. त्यामुळे प्रशासनाने मलप्रभा नदीघाट जवळील नागरिकांना हलविण्याचे प्रयत्न केले. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे दुर्गानगरातील निवासस्थान पाण्याखाली गेले आहे.
तालुक्यातील हालत्री नाल्यावरील पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे हेमाडगा, शिरोलीसह अनेक खेड्यांचा संपर्क तुटला.
तिनई आखेती पूल पाण्याखाली
जोयडा तालुक्यातील तिनई आखेती मार्गावरील पुल पाण्याखाली गेले आहे. या मार्गावरून वाहतुक करणारा ट्रक पाण्यामुळे रस्त्याबाहेर गेला. त्यामुळे अडकून पडला आहे.
जामगाव भागात आडीवरून पार प्रवास
तालुक्याच्या जंगलभागातील जामगाव, कोंगळा आदी भागात नदी नाल्यावरील आडीवरून पावसाळ्यात प्रवास करतात. या भागातील कोंगळा भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षिकेने आपल्या ११ महिन्याच्या बाळासह आडीवरून प्रवास करून आपली सेवा बजावली.
तालुक्यातील विविध गावातील नाल्यानी सुध्दा पाण्याची पातळी पार केली आहे. तालुक्यातील प्रत्येक नदी, नाले रूद्र अवतार धारण केले आहे.
तेव्हा प्रत्येकाना पूर्वकल्पना घेऊन प्रवास करावा. धोक्याची पातळी वाढली. प्रशासने तालुक्यात होणाऱ्या दुष्काळी निवारणासाठी सर्व तयारी केली आहे.