खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता.खानापूर) परिसरातील अनगडी, कामतगा आदी भागाच बकऱ्या, मेंढ्याना एका विशिष्ठ विषारी व्हायरसचा फैलाव झाल्याने अनगडीत सात दिवसात तीन मेंढ्याचा बळी गेला आहे.
या विषारी व्हायरसमुळे बकऱ्या, मेंढ्याना तोंडा, गळ्याला सूज येते. काही दिवसातच बकऱ्यांचा मृत्यू होतो.
यामध्ये हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी दत्तात्रय अंग्रोळकर यांच्या अनगडीत शेतात बकरी, मेंढ्या पाळल्या आहेत. नऊ मेंढ्या पैकी चार मेंढ्याचा या विषारी व्हायरसमुळे मृत्यू झाला. तर पाच मेंढ्या जीवंत असल्याने खानापूर तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोटगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन तपासणी केली. व उर्वरित मेंढ्याना एच एस लस देऊन त्याच्यावर उपचार केले आहेत.
या विषारी व्हायरसमुळे हलशी गावचा शेतकरी दत्तात्रय अंग्रोळकर याचे ५० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे या भागातील मेंढ पाळ शेतकरी वर्गातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोडगी, हलशी पशु दवाखान्याचे नागेश यरमाळकर, सतीश गावकर आदी मेंढ्याच्या उपचारासाठी प्रयत्न केले.