Sunday , July 26 2026
Breaking News

यशवंतरावांनी सीमाभागात दिलेले योगदान महत्त्वाचे!

Spread the love
प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा उद्धार झाला आहे. सध्याच्या पिढीने त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असे मत प्रा. डाॅ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करून ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते मुरगुड रोड वरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सागर परीट, महेश दिवटे, अमोल नारे, नितीन शेटके, रवी साळुंखे, प्रा. नानासाहेब जामदार, विठ्ठल वाघमोडे नंदकुमार राजगिरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित अभिवादन प्रसंगी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, सुजय पाटील, सोमनाथ शिंदे, बाळासाहेब कमते, अवधूत गुरव, धीरज वाडकर, प्रशांत हंडोरी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थितीत होते. नगरपालिका विरोधी गटातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक विलास गाडीवड्डर, अनिस मुल्ला विठ्ठल वाघमोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *