
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील पशुखात्याचे पशुवैद्यकीय डाॅ. मनोहर बी. दादमी यांची बागलकोट जिल्हापदी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून बढतीनिमित्त बदली झाली आहे. त्यांना खानापूर पशुखात्याच्या वतीने निरोप समारंभ नुकताच पार पडला.
यावेळी डॉ. मनोहर बी. दादमी यानी खानापूर तालुक्यात २०१७ पासुन पशु डाॅक्टर म्हणून गेली पाच वर्षे सेवा बजावली. सन २०२२ साली त्यांना बागलकोट जिल्हा मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून बढती मिळाली. गेली पाच वर्षे खानापूर तालुक्याच्या जंगलभागातील खेडगावातील जनावराची आरोग्य तपासणी करून शेतकरी वर्गाला लाभ करून दिला. त्यामुळे शेतकरी वर्गाला डॉ. मनोहर बी. दादमी हे एक वरदान होते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या नेहमी संपर्कात राहत असत. शेतकरी वर्गाचा ते आधार होते. त्यांनी जवळपास २५ वर्षे पशुखात्यात सेवा बजावली आहे.
खानापूर पशुखात्याच्या कार्यालयात त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोडगी, डाॅ. उमेश होसुर, डाॅ. गंगाधर बाळगट्टी, तसेच खानापूर पशुखात्याच्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta