बेळगाव : शिक्षणामुळेच आपल्याला खरी ओळख मिळते त्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेणे गरजेचे असून दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. त्यामुळे परीक्षेला चांगल्या प्रकारे सामोरे जा, असे प्रतिपादन मेरडा येथील मराठी शाळेतील सह शिक्षक एल. आय. देसाई यांनी केले.
हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संचालक सागर पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हलशी मराठी शाळेचे मुख्याध्यापक एल डी पाटील, निवृत्त मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी तर प्रमुख वक्ते म्हणून एल आय देसाई उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक किरण देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी सागर पाटील, अर्जुन देसाई, बी. आर. बुवाजी, एल. डी. पाटील, सह शिक्षक सुदन देसाई, भाग्यश्री दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शंकर पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून ज्ञानेश्वर झुंजवाडकर तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्राजल पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
प्रियांका काकतकर यांनी सूत्रसंचालन तर शंकर रागीपाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नागाप्पा देसाई, भाऊराव पाटील, पांडुरंग फौंडेकर, नारायण पाटील, गणपती देसाई, शंकर कोलकार, परशराम अंग्रोळकर, एस. जी. दड्डीकर, एल. एच. पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …