
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर श्रीगजानन ट्राॅफी ८ षटके मर्यादीत क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विजेता संघ म्हणून सरकार राॅयल मराठा संघ रामनगर तर उपविजेता संघ काॅलेज बाईज खानापूर ठरला.
मॅन ऑफ दि सिरीज बाळेकुंद्री संघाचा इजाझ खुरेशी मानकरी असून बेस्ट बॅटमन काॅलेज बाईजचा अर्जुन भोसले तर बेस्ट बाॅलर सरकार राॅयल मराठा संघाचा अमोल निलगेड हा ठरला.
विजेत्या संघाला बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बक्षिस समांभाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल होते.
यावेळी कार्यक्रमाला मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुस्कर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जि. प. सदस्य बाबूराव देसाई, अर्बन बँक संचालक मारूती पाटील, भाजप सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप रयतमोर्चा अध्यक्ष सदानंद होसुकर, माजी जि. प. सदस्य जोतिबा रेमाणी, लैला सुगर्सचे एमडी सदानंद पाटील, भाजप नेते राजेद्र रायका, वसंत देसाई, श्रीमहालक्ष्मी सोसायटीचे गुंडू पाखरे, नगरसेवक आपय्या कोडोळी, राजेद्र रायका, भाजप युवा नेते पंडित ओगले, सुनिल नाईकल, सुनिल पाटील, गुंडू गुरव, शिवराम पाटील, शांताराम पाटील, नागेश देवकरी, परशराम शिवठणकर, निवृती पाटील, प्रदिप पाटील, रमेश चव्हाण, जोतिबा पाटील, किरण तुडयेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितीतांचे स्वागत भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांनी पुष्प देऊन केले.
यावेळी गजानन पाटील पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेला १ लाख २१ हजार रूपये पहिले बक्षिस देण्यात आल्याबद्दल तालुका भाजप सेक्रेटरी गजानन पाटील यांचे कौतुक करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta