Sunday , September 20 2026
Breaking News

ईटी-गडाद चले जाओ…

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी व अभियंता आर. बी. गडाद यांच्या मनमानी कारभाराला सत्तारुढ नगराध्यक्षा-उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगलेच कंटाळलेले दिसताहेत. काल पालिकेत ईटी आणि सत्तारुढ नगरसेवकांत चांगलीच वादावादी झाल्याचे अधिकृतरित्या समजते. संतप्त उपनगराध्यक्ष अधिकारीच्या अंगावर धाऊन गेल्याची देखील जोरदार चर्चा केली जात आहे. सत्तारुढ नगरसेवकांना विश्वासात न घेता मुख्याधिकारी जगदीश ईटी काम करीत असल्याचे सांगितले जात आहे. ईटी यांनी नगराध्यक्षा-उपनगराध्यक्ष सत्तारुढ नगरसेवकांना अंधारात ठेवून रोजंदारी कामगारांची भरती केल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर रोजंदारी कामगारांकडून त्यांनी पैसे लागल्याचा आरोप देखील गेला जात आहे.

राजीनामा देणार

ईटी-गडाद यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सत्तारुढ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सदर वादविवाद प्रकरणवर आता पडद्या टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पालिकेतील कालच्या घटनेविषयी लोकांत चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *