Wednesday , March 4 2026
Breaking News

आंबेडकर जयंतीपर्यंत शाळा चालू ठेवा : एन. सी. तलवार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : भारतीय घटेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. मात्र कर्नाटक राज्यातील शाळाना १० एप्रिलपासून शाळाना सुट्टी जाहिर केली जाते. मात्र घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शाळाना सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गाची उपस्थित कमी प्रमाणात असते. तेव्हा कर्नाटकातील शाळाना १५ एप्रिल पासुन सुट्टी जाहिर करावी, अशी मागणी एन. सी. तलवार यांनी गुरूवारी तालुका पंचायत सभागृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वभावी सभेत बोलताना केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रविण जैन होते. व्यासपीठावर सीपीआय सुरेश जैन, बीईओ लक्ष्मणराव यकुंडी, तालुका पंचायतीचे मॅनेजर एस. एस. सपटला, समाजकल्याण खात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक गिरीष कुरहट्टी यांनी केले.
बैठकीत रवी काडगी म्हणाले की, गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे नियमाचे बंधन आल्याने साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मात्र यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जावी. बैठकीत प्रकाश मादार, संदीप चलवादी, शरद व्हनाईक, राजू कांबळे, रामचंद्र मादार, श्री. राठोड आदीनी विचार मांडले.

यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांनी शहरासह तालुक्यातील विविध गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी बीईओ लक्ष्मणराव यकुंडी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याविषयी विचार व्यक्त केले.
बैठकीला तालुका अधिकारी, तालुक्यातील विविध संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *