
खानापूर (प्रतिनिधी) : सैन्यात भरती होऊन देशाचे संरक्षण करून आलेल्या सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी सिध्देश्वर केप्पना मादीहाळ हा भारतीय सैन्यातील आयटीबीपीमध्ये भरती होऊन देशाच्या बाॅर्डवर सेवा बजावून प्रथमच आपल्या सिंगीनकोप गावी शनिवारी आला. त्यानिमित्ताने सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत भारतीय सैनिकाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारात टाळ्या आणि पुष्पवृष्टी करून केले.
यावेळी शाळेच्या शिक्षिकेची सौ. एल. डी. नलवडी यानी आरती ओवाळून, औक्षण करून त्याचे स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायतीचे माजी सदस्य कृष्णा कुंभार, कलराम पाटील, झाड अंकले ग्राम पंचायतीचे सदस्य म्हात्रू धबाले, दुधापा कुंभार, एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार, गावचे नागरिक, संत गोराबा कुंभार युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यांनी स्वागत केले. तर अतिथी शिक्षिका मुक्ता नंद्याळकर यानी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta