Tuesday , March 3 2026
Breaking News

बेकवाडच्या ग्रा. पं. सदस्याचा रोहयो कामात मनमानी झाल्यासंदर्भात उद्या आंदोलनाचा इशारा

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील खैरवाडात रोजगार हमी योजनेअंतर्गत यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती उजेडात आली आहे.
सरकारने गरीब जनतेच्या हाताला कामे मिळावी. त्या गरीब जनतेला पोट भरावे. या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे.
मात्र बेकवाड ग्राम पंचायतीचे पीडीओ नागापा बन्नी व ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव यांनी मनमानी करून गावच्या अरण्य विभागातील सर्वे नंबर २१ मधील १० लाखाचे बंधारा दुरूस्तीचे खडीकरणाचे काम हाती घेतले आहे.
संबंधित काम स्थानिक ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता तसेच घरी बसणाऱ्या आपल्या मर्जीतील मजुराचे जाॅब कार्ड देऊन परस्पर निधी हडप केल्याचा केल्या प्रकरणी तसेच जेसीबी लावून केल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य रूक्माना झुंजवाडकर, नुतन भुजंगराव यानी जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, तालुका पंचायत अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मात्र अद्यापही न्याय मिळाला नाही. याबद्दल उद्या सोमवार दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात रोजगार कामगारांसोबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर न्याय मिळाले नाही तर उपोषणाचा मार्ग पत्करणार आसल्याचे रविवारी शिवस्मारकात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *