Sunday , September 20 2026
Breaking News

देवरवाडी येथील मागासवर्गीय स्मशानभूमीत बोअरवेलच्या कामात यश

Spread the love

शिनोळी : वैजनाथ देवरवाडी गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून चंदगड पंचायत समिती सदस्या सौ. रुपा भैरु खांडेकर यांच्या हस्ते मागासवर्गीय स्मशानभूमीमध्ये बोअरवेलचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच गितांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, ग्रामपंचायत सदस्या मंजुळा कांबळे, प्रभावती मजुकर, मनिषा भोगण तसेच देवरवाडीतील समाजकार्यात अग्रेसर असणारे ग्रामस्थ राजाराम करडे, लक्ष्मण आडाव, परशराम आंदोचे, पोलीस पाटील जयवंत कांबळे, भोमाणी कांबळे, विष्णू कांबळे, पुंडलिक कांबळे, प्रा.सुरेश कांबळे, प्रा.डॉ.नागेंद्र जाधव, विजय भांदुर्गे, अमोल भोगण, सामाजिक कार्यकर्ते भैरु खांडेकर, संघर्ष प्रज्ञावंत तसेच गव्हरमेंन्ट कॉन्ट्रॅक्टर प्रविण पाटील उपस्थित होते. सदर बोअरवेलला 3 इंच पाणी लागले आहे. पं. स.चंदगड सदस्या सौ. रुपा भैरु खांडेकर यांच्या विकास निधीतून सदर बोअरवेलचे काम यशस्वी झाल्याने गावातील मागासवर्गीय समाजबांधवांकडून तसेच ग्रामपंचायत देवरवाडी व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच देवरवाडी सारख्या उपेक्षित गावाला सहकार्य केल्याचे व भविष्यात अनेक विकास कामासाठी कटीबद्ध असल्याचे सौ. रूपा भैरू खांडेकर यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *