Sunday , September 20 2026
Breaking News

ज्ञान मंदिरास दिलेली देणगी ही श्रेष्ठच

Spread the love
बी. एस. पाटील: माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट
निपाणी (वार्ता) : ज्ञानमंदिर हे विद्येचे सर्वश्रेष्ठ मंदिर असून येथे सर्व सामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असून यासाठी दिलेली देणगी ही सर्वात श्रेष्ठ असल्याचे मत मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी  व्यक्त केले. ते माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप देणगी स्वीकारतेवेळी बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे
माजी विद्यार्थी शामराव पाटील(माजी सैनिक), दिलीप पाटील (माजी सैनिक) व  दादासाहेब पाटील (कृषी उद्योजक) यांनी ३६ हजार रुपये किंमतीचा एक लॅपटॉप विद्यालयास भेट दिला.
 यावेळी बोलताना मेजर दिलीप पाटील यांनी, ज्या विद्यालयात आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, त्या विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासत आम्ही विद्यालयाची गरज लक्षात घेवून  लॅपटॉप भेट देत असल्याचे सांगितले. इतर विद्यार्थ्यांनीही विद्यालयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विद्यालयाच्या वतीने देणगीदार माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एस. एस. चौगुले, टी. एम. यादव, ए. ए. चौगुले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *