Wednesday , March 4 2026
Breaking News

ग्रा. पं. सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांच्या आंदोलनाला सुरूवात

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील खैरवाड गावचे ग्राम पंचायत सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांनी तालुका पंचायतीवर सोमवारपासून आदोलनाला प्रारंभ केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामात यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती उजेडात आली आहे.
सरकारने गरीब जनेतच्या हाताला कामे मिळावी. त्या गरीब जनतेला पोट भरावे. या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे.
मात्र बेकवाड ग्राम पंचायतीचे पीडीओ नागापा बन्नी व ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव यांनी मनमानी करून गावच्या अरण्य विभागातील सर्वे नंबर २१ मधील १० लाखाचे बंधारा दुरूस्तीचे खडीकरणाचे काम हाती घेतले आहे.
संबंधित काम स्थानिक ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता तसेच घरी बसणाऱ्या आपल्या मर्जीतील मजुराचे जाॅब कार्ड देऊन परस्पर निधी हडप केल्याप्रकरणी तसेच जेसीबी लावून केल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य रूक्माणा झुंजवाडकर, सदस्या नुतन भुजंगराव यांनी जिल्हा पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी, तालुका पंचायत अधिकारी यांच्याकडे याबाबत चौकशी व्हावी, अशी निवेदनव्दारे मागणी केली आहे. मात्र अद्यापही न्याय मिळाला नाही. म्हणून सोमवार दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात रोजगार कामगारांसोबत आंदोलनास सुरूवात झाली आहे. जर येत्या दोन दिवसात न्याय मिळाले नाही तर अमरण उपोषणाचा मार्ग पत्करणार आहे, असे आंदोलनाच्या ठिकाणी बोलताना सांगितले.
यावेळी खैरवाड गावचे रोजगार महिला तसेच रोजगार पुरूष मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रारंभी तालुका पंचायतीवर मोर्चा काढुन तालुका पंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरूवात झाली.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *