खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सिव्हील इंजिनियर संघटनेची स्थापना गुरूवारी दि. ७ रोजी शिवस्मारक चौकातील सभागृहात उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हील इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुलम होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव सिव्हील इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ, राजेंद्र मुतगेकर, लैला शुर्गसचे एमडी सदानंद पाटील, मांगरिश कंस्ट्रक्शनचे एम. डी. सुनील देशपांडे, आर. एन. शट्टी पाॅलिटेनिक काॅलेजचे प्राचार्य शशिधर हिरेमठ, पीडीओ संघटना अध्यक्ष आनंद भिंगे, नगरपंचायतीचे इंजिनियर सुहास गुरव, इंजिनियर संघटनेचे उपाध्यक्ष शिराज नाईक, दत्ता उघाडे, शिवशंकर कट्टीमनी, नगरसेवक विनायक कलाल, आपय्या कोडोळी, नगरसेविका मेघा कुंदरगी, शोभा गावले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री. वाली यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत सिदु हिरेमठ यांनी केले.
यावेळी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन व विश्वेश्वरय्या फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना पी. एस. हिरेमठ यानी संघटना बांधताना काही तत्वाचे पालन करणे महत्वाचे आहे. यामध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, कष्ट अशी तत्वे पाळली तर संघटना मजबूत होते. तेव्हा सिव्हील इंजिनियर संघटना नक्कीच मजबूत होईल. अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी लैला शुर्गसचे एमडी सदानंद पाटील, राजेंद्र मुतगेकर, प्राचार्य शशिधर हिरेमठ, पीडीओ आनंद भिंगे, सुनिल देशपांडे आदीनी विचार व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना इंजिनियर राजेंद्र म्हणाले की, तालुक्यात सिव्हील इंजिनियर संघटनेचे गरज होती. ती आज पूर्ण झाली. ही संघटना दीर्घ काळ टिकण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करू तसेच इंजिनियर संघटनेचे कार्यालयही लवकर उभारू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. वाली यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी इंजिनियर राजू गुरव, धनंजय गुरव, विष्णू गुरव, चंद्रकांत हट्टीकर, सचिन गुरव, सुनिल गावडे, संतोष नरसनावर आदीनी परिश्रम घेतले.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …