
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता खानापूर) येथे शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीला ग्राम पंचायत अध्यक्षा सौ. गीता अप्पाजी हलगेकर याच्या हस्ते अभिषेक घालुन प्राणप्रतिष्ठापनेचा २० वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गुरव उपस्थित होते. तर दीपप्रज्वलन श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, मल्लेशी खांबले, विठ्ठलराव करंबळकर, मारूती गुरव ग्राम पंचायत उपाध्यक्ष, चन्नापा गुरव आदीच्याहस्ते करण्यात आले. तर विविध फोटोचे पुजन लक्ष्मण गुरव, चांगापा निलजकर, जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंदरे, नारायण गुरव, नागेश जोगोजी, गंगाराम हलगेकर, राजू हलगेकर, परशराम तिरवीर आदीच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी करंबळकर, रघूनाथ फटके, लक्ष्मण तिरवीर, सौ. रूपा तिरवीर, सौ. अनिता मुरगोड, सौ. रेखा सुतार, रेणूका कोलकार, अशोक कंरंबळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत के. जी. कुंभार यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष महादेव गुरव म्हणाले की, तोपिनकट्टीत गणेशमुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २० वा वर्धापनदिन मोठा उत्साहात साजरा होत आहे. गेली २० वर्षा कधी खंड होऊ न देता वर्धापनदिन सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्या बरोबरच महाप्रसादाचे आयोजन करून गावात आनंदसोहळा साजरा केला जातो. ही परंपरा अशीच कायम ठेवून एकोपाने वर्धापनदिन सोहळा साजरा करू असे सांगितले. यावेळी पाहूण्याची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के. जी. कुंभार यांनी केले. तर आभार यल्लापा कुप्पटगीरी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta