धनगरी गीत गायन स्पर्धा : विविध धार्मिक कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव यात्रा आणि बिरदेव देवस्थान यात्रा कमिटी तर्फे शनिवारपासून (ता.9) सोमवार अखेर (ता.11) बिरदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व धनगरी ओव्या च्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवारी(ता.9) रात्री 8 वाजता सिध्देश्वर देवालय येथे वालंग जमविण्याचा कार्यक्रम व श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी (ता.10) सकाळी 8 वाजता श्रींच्या पालखीची गजनृत्यमध्ये मिरवणूक होणार आहे. सायंकाळी 5 वाजता वाघापूर येथील भगवान आप्पासाहेब महाराज व सहकार्यांचा भाकणूकीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता कथा गंगा सुरवंती’ची या विषयावर रंगदार, ढंगदार धनगरी गायन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यासाठी अनुक्रमे 10 हजार 1 व चषक, 7 हजार 1, 5 हजार 1, 5 हजार 1, 3 हजार 1, 2 हजार 1, आणि 1501 रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ठ गायन 501 रुपये, उत्कृष्ठ डिंबाड्या 501 रुपये, उत्कृष्ठ वेषभुषा 501 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. वालंग येणार्या प्रत्येक ढोलास 101 रूपये व मानाचा फेटा दिला जाईल. देवाची छत्री घेऊन येणार्या संघास एका छत्रीस 125 रूपये दिले जाईल. सोमवारी(ता.11) रोजी सकाळी करतोडणी करून यात्रेची सांगता होणार असल्याचे कमिटीने कळविले आहे.
Check Also
मूलभूत सोयी सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचे आमदार जोल्ले यांना निवेदन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, कमलनगर परिसरात रस्ते, वीज, पाणी, गटारी …