
बेळगाव : हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गुरुवार (ता. 21) रोजी अमृतमहोत्सव रण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात होणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी शाळेचा अमृत महोत्सव कार्यक्रम रविवारी (ता. 24) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी अमृत महोत्सव रण या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेला सकाळी सात वाजता शाळे पासून सुरुवात होणार आहे याची नोंद घेऊन स्पर्धकांनी शाळेकडे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta