Wednesday , March 4 2026
Breaking News

माजी सैनिक मल्टी-पर्पज को-ऑप. सोसायटी खानापूरचा 12वा वर्धापन दिन साजरा

Spread the love

खानापूर : माजी सैनिक मल्टी-पर्पज को-ऑप. सोसायटी लि. खानापूरचा 12वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन जयराम पु. पाटील व संचालक मंडळ यांच्याहस्ते केक कापून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून खानापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना डॉ. नारायण साहेब, चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत फळे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मारुती चन्नू गुरव (तोपिनकट्टी), लक्ष्मण गावडू पाटील (मेराडा), रामकृष्ण शिवाजी पाटील (नावगा), विठ्ठल हणमंत पाटील (कारलगा), परशराम बाळू हेब्बाळकर (खानापूर), विष्णू नारायण घोडेकर (बिडी), राजश्री राजाराम पाटील (गर्लगुंजी), विद्या शांताराम जाधव (खानापूर), पूजा डी. गावकर सेक्रेटरी, कु. दीपिका राजू तांबूरकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *