Saturday , June 6 2026
Breaking News

बसस्थानक परिसरात आता केवळ प्रिपेड रिक्षा : आमदार अनिल बेनके

Spread the love


बेळगाव : बेळगावचे मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानक परिसरात केवळ प्रिपेड ऑटोरिक्षा स्टँड असणार आहे. सर्व रिक्षांनी प्रिपेड स्टॅंडमध्येच नंबर लावावा. कोणत्याही खाजगी ऑटो स्टँडला इथे परवानगी दिली जाणार नाही, असं स्पष्टीकरण उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला.

सोमवारी सकाळी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, उत्तरचे रहदारी पोलीस निरीक्षक आणि कँटोन्मेंट अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसराची पाहणी केली.
बसस्थानक परिसरामध्ये भाजी विकणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. जवळपास 60 कोटी खर्च करून मध्यवर्ती आणि सीबीटी बस स्टँड होणार आहेत त्याठिकाणी बेळगावला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल असं बेनके यांनी यावेळी नमूद केलं.
बस स्थानक परिसरामध्ये तीन रिक्षा स्टँड आहेत तिन्ही रिक्षा स्टँड काढली जातील आणि बसस्थानक परिसरात केवळ प्रीपेड रिक्षा सुरु होईल अनिल बेनके यांनी सांगितले.
आगामी सहा महिन्यांमध्ये बेळगावच्या नूतन बसस्थानकाचा उद्घाटन करण्यात येईल लवकरात लवकर बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करू, असेही बेनके म्हणाले.
भाजीविक्रेते रस्त्यावर बसून विकणाऱ्या बद्दल विचारले असता कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजी विक्री किंवा इतरांची काय पर्यायी व्यवस्था करता येईल त्याबद्दलही आपण विचार करू असेही ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love  विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *