
खानापूर (प्रतिनिधी) : वडेबैलात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही रविवारी दि. 10 रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी रविवार पहाटे हभप गंगाराम नांदुरकर, यडोगा यांच्या अधिष्ठानाखाली सोहळ्याला प्रारंभ होऊन सकाळी पोथी स्थापना, पुजा, आरती, सामुहिक भजन होऊन यावेळी ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यात आले. दुपारी तुकारामांच्या गाथावरील भजन, प्रवचन, नामजप तसेच रात्री विविध गावचे भजन असे दैनदिन कार्यक्रम झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर पाटील उपस्थित होते.
तर दीपप्रज्वलन भाजपचे नेते, माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक, अरविंद पाटील, कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, माजा जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, खानापूर तालुका विकास आघाडी अध्यक्ष भरमाणी पाटील आदींच्याहस्ते करण्यात आले. तर विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन हणमंत पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले, माजी सभापती सयाजी पाटील, कल्लापा पाटील, नारायण यळगुकर, भगवंत पाटील, गणपती पाटील, रामू पाटील, मारूती पाटील, लक्ष्मण पाटील, अरूण कडबी, नारायण पाटील आदीच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
सोमवारी दि. 11 रोजी पहाटे काकड आरती होईन सकाळी गावातून दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta