खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पंचक्रोशीतील ग्रामदैवत मऱ्याम्मा देवीच्या इमारतीचा जिर्णोध्दार करून मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. १५ रोजी आयोजित महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.
खानापूर शहरातील ग्रामदैवत श्री मऱ्याम्मा देवीच्या मंदिराचा मुर्ती प्राणप्रतिष्ठाप्राणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त मंगळवारी दि. १२ पासुन विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला.
मंगळवार दि. १२ रोजी मऱ्याम्मा देवीची सवाद्य मिरवणूक खानापूर शहरातुन काढण्यात आली. बुधवारी दि. १३ रोजी सकाळी देवता पुजन, हवन, शांती होम, व धार्मिक विधी पार पडल्या. तर गुरूवारी दि. १४ रोजी सकाळी श्री श्री चंन्नबसवदेवरू स्वामीजी अवरोळी बेळकी यांच्या हस्ते शिखर कळसारोहण, त्यानंतर मऱ्याम्मा देवीची मूर्ती प्रतिष्ठापणा, महापुजन, प्रार्थना, गाऱ्हाणे आदी कार्यक्रम झाले.
आज शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी मंदिरात सत्यनारायण पुजा होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.
या सोहळ्याला व महाप्रसादाला खानापूर शहरासह परिसरातील हलकर्णी, गर्लगुंजी, इदलहोंड, गणेबैल, रामगुरवाडी, कुप्पटगिरी, अंकले, करंबळ, रूमेवाडी आदीनी खानापूर तालुक्यासह बेळगाव तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली होती.