
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २० कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून कामाला सुरूवात झाली. मात्र खानापूर जांबोटी रस्त्यापासून रामगुरवाडी गावापर्यंत साधारण एक किलोमीटर रस्त्यावर एक महिन्यांपूर्वी जे डांबरीकरण करण्यात आले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले असून काही ठिकाणी खड्डे पडले असून याच्यात डांबराचे प्रमाणही कमी प्रमाणात झाले आहे. तेव्हा लोकप्रतिनिधीसह संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित ठेकेदार व यात सामील असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या गावातील नागरिकांनी केली असुन सदर डांबरीकरण 19 मार्च रोजी करण्यात आले असुन आज 17 एप्रिल आहे अजुन एक महिना होण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत एवढ्यातच या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे तर पुढे पाऊस सुरू झाल्यानंतर काय होईल असा सवाल या गावातील सामाजिक कार्यकर्ते किरण पुंडलीक मोटर व संदिप देवाप्पा धबाले व काही युवा कार्यकर्त्यांनी केला असून सामाजिक कार्यकर्ते किरण पुंडलीक मोटर यांनी या रस्त्यावर जे निकृष्ट डांबरीकरण दर्जाचे झाले आहे याची आरटीआय कायदा अंतर्गत सदर सरकारी खात्याकडून माहिती मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
तेव्हा संबंधित महामार्गावरील निकृष्ट डांबरीकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta