Sunday , July 26 2026
Breaking News

भरतेश एज्युकेशन अँड ट्रस्टच्यावतीने हिरक महोत्सवीवर्षानिमित्त कार्यक्रम

Spread the love

बेळगाव : भरतेश एज्युकेशन अँड ट्रस्टच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत भरतेश कॉलेज हिरक महोत्सवात प्रवेश करणार असल्याची माहिती विनोद दोडन्नावर यांनी दिली.

भरतेश कॉलेजची स्थापना 1962 मध्ये झाली असून गेल्या 60 वर्षांमध्ये संस्थेने आजपर्यंत 36 हजाराहून अधिक विद्यार्थी घडविले आहेत. यातील काही विद्यार्थी देश आणि परदेशात विविध पदांवर सेवा बजावत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच यावेळी ट्रस्टचा सामर्थ्यवावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्याला बळकट करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात असल्याची माहिती देण्यात आली.

दिनांक 20 एप्रिल रोजी हलगा कॅम्पस सुवर्णसौध समोर सायंकाळी पाच वाजता संस्थेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देऊन या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी विनोद दोड्डणावर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेत संस्थेचे चेअरमन डॉक्टर जिनदत्त देसाई, व्हाईस चेअरमन राजीव दोडणावर, भूषण मिरजी, श्रीपाल खेमलापुरे, प्रकाश उपाध्ये उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *