
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील वीर संगोळी रायण्णा समाधीस्थळी भाजप युवा मोर्चा खानापूर यांच्यावतीने तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
यावेळी बोलताना भाजपचे नेते व माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, आपल्या भाजप पक्षाच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार माजी सैनिकांचा आदर व्हावा. ज्यांनी आपले आयुष्य देशाच्या संरक्षणासाठी खर्ची घातले. डोळ्यात तेल घालून सीमेवर लढले. त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. त्याचा सत्कार करणे हे कर्तव्य म्हणून नंदगड गावच्या वीर संगोळी रायण्णांच्या समाधीस्थळी भाजप युवा मोर्चा वतीने सत्कार होतो ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी तालुक्यातील माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी बेळगांव जिल्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष दर्शन किलारी, सरचिटणीस रूद्रापा तुळाजी, संतोष कडुपा, शंकर सोनोळी, मोरेश्वरा मुनवळ्ळी, श्रीशैल शिवपूजा, गुरूवर्य राजीव पेजोळी, सुभाष घंटी, राजीव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta