
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे शनिवारी दि. २३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या वादळी वाऱ्यासह वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. याचवेळी कुसमळी गावचे शेतकरी यल्लापा कल्लहोळकर यांच्या परसुतील नारळाच्या झाडावर कडाडाच्या आवाजसह वीज पडली. लागलीच नारळाच्या गाभ्याने पेड घेतला व बघता बघता नारळाचे झाड पेटू लागले.
हे आश्चर्य पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कुसमळी हे गाव खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलातील गाव आहे.
याभागात मुसळधार पाऊस पडत असतो. अतिपावसाचा भाग असल्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाशी अनेकवेळा सामना करावा लागतो.
Belgaum Varta Belgaum Varta