खानापूर : व्हॉट्सॲप ग्रुपवरील वादविवादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने नंदगड पोलिस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते आहेत. रविवारी या ग्रुपमध्ये खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या मतदारसंघातील घोटगाळी रस्त्याच्या कामासंदर्भात एक पोस्ट टाकण्यात आली. या पोस्टविरोधात टिप्पणी करताना एकाने लोकप्रतिनिधींचा एकेरी उल्लेख करून अपमान केला. तसेच भ्रष्टाचाराचा आरोपही केला.
या रागातून लोकप्रतिनिधींचे निकटवर्तीय असलेल्या पाचजणांनी घोटगाळी (ता. खानापूर) येथील शिक्षक खेमराज सहदेव गडकरी (वय 39) यांना मारहाण केल्याची तक्रार शिक्षकाने पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणी आमदारांचे भाऊ सुरेश जाधव आणि इतर चौघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सोमवारी सायंकाळी उशिरा सुरेश जाधव यांनी खेमराज गडकरी यांच्याविरोधात व्हॉट्सॲप ग्रुपवर लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याची तक्रार दाखल केली आहे.
Check Also
खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!
Spread the love आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …
Belgaum Varta Belgaum Varta