Friday , February 7 2025
Breaking News

मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांची जिव्हाळा फाऊंडेशनने भागवली पाण्याची गरज

Spread the love


बेळगाव : अतिवृष्टीमुळे सगळीकडे महापूर आल्याने बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये सुध्दा पाणी भरले आणि गेल्या आठवड्यापासून शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. यामुळे अनेकांना पाण्याविना जीवन व्यतीत करावे लागत आहे.

शाहुनगरमधील मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांनासुद्धा पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नाही ही बातमी जिव्हाळा फाऊंडेशनला समजताच त्यांनी वापरण्यासाठी दोन टॅंकर आणि पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याची सोय केली.
तसेच येथील वृद्धांना चिकणगुणिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली.
यावेळी अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, सचिव आरती निप्पाणीकर, श्रीनिवास गुडमट्टी, संजीवनी पाटील उपस्थित होत्या.

या कार्यासाठी दयानंद चौगुले आणि श्रीनिवास गुडमट्टी यांचे विशेष सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग समिती यांच्यातर्फे सूर्यनमस्काराचा कार्यक्रम संपन्न

Spread the love  बेळगाव : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा भारती व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *