खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात सोमवारी दि. २५ रोजी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबीरात १४ स्टाॅलचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सकाळी महाआरोग्य शिबिराचे उदघाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर तहसीदार प्रविण जैन, डॉ. एम. व्ही. किडसन्नावर, डॉ. अनिल कोरबी, डॉ. चंदन देवडी, डॉ. ए. एस. पट्टेल, डॉ. बीएन तुक्कार, तसेच नगरपंचायतीचे चिफऑफिसर बाबासाहेब माने, बीईओ लक्ष्मणराव यकुंडी, सीडीपीओ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, डाॅ. संजय डुमगोळ, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेविका मेघा कुंदरगी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांचे स्वागत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यानी केले.
यावेळी विविध प्रकारच्या रुग्णांची तपासणी करून त्याच्यावर उपचार व औषधाचा पुरवठा करण्यात आला.
या महाआरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
खानापूर तालुक्यातील नागरिकांनी मधुमेह, रक्तदाब, कुष्ठरोग, कर्करोग, हाडांचे आजार तसेच महिलाचे आजार आदीवरही उपचार करून औषधाचा लाभ घेतला.
याशिबीरात केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडून मिळणाऱ्या योजनेची माहिती देण्यात आली. याशिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथीक उपचारही करण्यात आले. यावेळी औषधे विक्रीसाठी स्टाॅल लावण्यात आले होते. शिबीराचे औचित्य साधुन आयुष्यमान भारत, हेल्थ कार्ड योजनेंतर्गत आयुष्यमान हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले.
त्यामुळे हे महाआरोग्य शिबिर खानापूर तालुक्यातील जनतेला लाभदायक ठरला आहे.
यावेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉक्टर, नर्स, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. शेवटी आभार डॉ. संजय नाद्रे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta