
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवबसव जयंती उत्सव यांच्यावतीने सोमवारी दि. २ रोजी सकाळी शिवबसवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
या शिवसवजयंतीला भाजपच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे म्हणण्यात आले. तसेच शिवाजी महाराजांचे पाळणे म्हणण्यात आले. यावेळी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी क्षत्रिय मराठा समाज जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून केले.
कार्यक्रमाला विवेक गीरी, खानापूर तालुका क्षत्रियय परिषद अध्यक्ष अभिलाष देसाई, सचिव व माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश, नारायण कदम, सिताराम बडरे, दयानंद चोपडे, बाबू शिवनगौडा, शुभम पाटील, मंजुनाथ पवार, विनायक पाटील, राहुल पवार, विठ्ठल पाटील, अमृत पाटील, निरंजन बिर्जे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta