
खानापूर : घोटगाळी ग्रामपंचायत येथील सदस्य श्री. रफिक हलशिकर यांनी कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना स्वतः उत्तम डॉक्टर असल्याचा दावा करत काही पेशंटवर उपचार करत होते. त्यांना याबाबतीत अनेक वेळा विविध वैद्यकीय पथकाने रंगेहाथ पकडून समज देऊन सोडले होते. तरी लोकांच्या जीवाशी खेळ करायचा त्यांनी सोडला नाही. गावातील भोळ्या जनतेला जादूटोणाचे उपचार करणारे हे ढोंगी डॉक्टर हलशिकर आज खऱ्या अर्थाने दवाखान्यात काही पेशंटना इंजेक्शन आणि सलाईन लावून त्यांच्यावर उपचार करत होते.
गेल्या काही महिन्यांपासून रामनगरसारख्या बीएचएमएस डॉक्टरना सुद्धा परवानगी नाकारली गेली असताना ढोंगी डॉक्टर हलशिकर यांनी तर कहरच केला. स्वतः मेडीकल चालवून कोणत्याही प्रकारची औषधे वाटेल त्या रकमेला देण्याचे नवीन धाडसी कृत्य सुरू केले होते.
आज डी. एच. ओ. बेळगाव, टी. एच. ओ. खानापूर आणि आयुष खात्याचे अधिकारी बेळगाव यांनी सापळा रचून पेशंटना दवाखान्यातच बंदी करून दवाखाना सील केला होता. पण पेशंटनी गयावया केल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आले. आणि ढोंगी डॉक्टर हलशिकर यांना ताब्यात घेऊन बेळगावला जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन जाण्यात आले.
याबाबतीत पूर्वी कित्येक वेळा अशी धाड पडून देखील सुध्दा असे ढोंगी डॉक्टर पैशाच्या जोरावर, राजकीय पाठबळावर सुखरूप बाहेर येतात आणि पुन्हा जनतेच्या जीवाशी खेळतात.
Belgaum Varta Belgaum Varta