
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मऱ्याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात नविन लक्ष्मी आणि मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा शुक्रवारी दि. ६ रोजी करण्यात आला.
यानिमित्ताने मंगळवारी व बुधवारी गावातून मुर्तीची मिरवणूक वाद्याच्या तालावर व भंडाऱ्याची उधळण करत करण्यात आली.
गुरूवारी नुतन मंदिराची वास्तूशांती करण्यात आली.
शुक्रवारी दि. ६ रोजी पहाटे लक्ष्मी देवीला हजारो भक्ताच्या उपस्थितीत अक्षता रोपन होऊन तसेच लक्ष्मी व मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची भटजीच्याहस्ते प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी
गावच्या पंचाच्या व मानकऱ्यांहस्ते पुजन करून, अभिषेक, विधीवत पूजा करण्यात.
पहाटे पासुन भाविकांनी मंदिराच्या आवारात गर्दी केली होती.
या सोहळ्याला गर्लगुंजी गावासह तोपीनकट्टी, निडगल, इदलहोंड, सिगीनकोप, अंकले, तालुक्यातील अनेक गावातील
अबालपासुन वृध्दापर्यत सर्वजण सहभागी झाले होते.
दुपारी महाप्रसादाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
मोठ्या उत्साहाने गर्लगुंजीत लक्ष्मी आणि मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta