खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी दि. ११ रोजी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी माऊली देवीची पालखी माऊली मंदिराकडे प्रयाण झाली. त्यानंतर माऊलीदेवीची विधीवत पुजा होऊन गाऱ्हाणा घालुन यात्रेला सुरूवात झाली.
बुधवारी दि. ११ रोजी पहाटे सुवासिनी गावातुन आरती माऊली मंदिराकडे येऊन पुजाऱ्यांच्याहस्ते अभिषेक, विधीवत पुजा होऊन सुवासिनीच्या इंगळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
त्यानंतर भाविकांनी माऊली देवीचे दर्शन घेऊन ओटी भरणे व नवस फेडणे आदी कार्यक्रम होऊन, हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी महाप्रसादासाठी गर्लगुंजी वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी महाप्रसाद मोठ्या उत्साहाने तयार करून सकाळी ९ ते १२ पर्यंत महाप्रसाद वाटण्यात आला.
रात्री ९ वाजता करमणूकीचे कार्यक्रम म्हणून माऊली नाट्य मंडळ याच्यावतीने सुडाची आग हा सामाजिक नाटक होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta