Tuesday , March 3 2026
Breaking News

शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पुजारी रामू मिराशी होते.
यावेळी रवळनाथ मंदिराचा कळसारोहण कुंभार्डा येथील हंडीभडगंनाथ मठाचे मठाधिश श्री पिरयोगी मोहननाथजी यांच्याहस्ते करण्यात आला. तर रवळनाथ मंदिराचा लोकार्पण श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजपनेते विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात घोटगाळी ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी, माजी जि. प. सदस्य बाबूराव देसाई, संदीप देसाई, संभाजी देसाई, डॉ. रफिक हलशीकर, मधुकर कवळेकर, संतोष कसर्लेकर, अमर कुंभार, श्रीकांत देसाई व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्य्त आले.
तर विविध देवदेवताच्या फोटोचे पुजन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुलीच्या ईशस्तवन व स्वागतगीताने पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आरएफओ प्रशात गौराणी, लोंढा आरएफओ नागराज भिमगोळ, जिल्हा आरएफओ एम. जी. नंद्यापगोळ, तानाजी गावडे, राजकुमार बोरकर आदीचा कार्यक्रमाचे औचित्य साधुन शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक नारायण पाटील, पीटर डिसोजा अभियंते, केदार शिवनगेकर आदीची खास उपस्थिती दिसुन आली. यावेळी खानापूर तालुका विकास आघाडी अध्यक्ष भरमानी पाटील, गोविंद पाटील व इतर मान्यवर तसेच गावचे पंच, प्रतिष्ठित नागरिक हजर होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. पी. गीरी यांनी केले तर आभार बळीराम मिराशी यांच्याहस्ते करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *