Wednesday , July 15 2026
Breaking News

भाजपच्या कोअर कमिटीची उद्या बैठक

Spread the love

बंगळुरू : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बंगळुरू येथे उद्या होणार असून या बैठकीत राज्यातील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांबाबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्याशी काल या निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. उद्या 14 मे रोजी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत कायदा मंत्र्यांनी माहिती दिलेली आहेच. बृहत बेंगळूर महापालिकेशी संबंधित एक खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तालुका आणि जिल्हा पंच्यात निवडणुकीबाबत आम्ही कोर्टाकडे मार्गदर्शन मागितले आहे. कादेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या ओबीसींना आरक्षण द्यावे लागणार आहे. जुन्या संरचनेनुसार ओबीसी आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आरक्षण देण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली आहे, ती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला. ओबीसी आरक्षणाबाबत समिती नेमण्याच्या प्रश्नावर बोम्मई म्हणाले, अशी समिती या आधीच नेमलेली आहे. पण आधी आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. जुन्या आरक्षणाची मुदत संपली आहे. आम्हाला त्या आरक्षणानुसार निवडणूक घेण्याची परवानगी मिळावी किंवा नव्या आरक्षणासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधबासह १३ रोपवे प्रकल्पांना गती द्या

Spread the love  मंत्री के. जे. जॉर्ज; अंजनाद्रीसह महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर भर बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *