खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्वप्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रारंभोत्सव सोमवारी दि. 16 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन गावातून प्रभात फेरी काढून शाळा प्रारंभोत्सवाचा शुभारंभ केला.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, शिक्षण प्रेमी कलराम पाटील, माजी तालुका पंचायत सदस्या सौ. कविता कुंभार, ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार तसेच शाळा सुधारणा समितीचे सदस्य, प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एल. डी. पाटील, अतिथी शिक्षिका मुक्ता नंद्याळकर, आदीनी सहभाग दर्शविला.
यावेळी सिंगीनकोप गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
त्यानंतर शाळेच्या आवारात शाळा प्रारंभोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी यांनी केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी शाळा प्रारंभोत्सव विषयी विविध विषयावर शिक्षकांनी चर्चा केली.
तर उपस्थित पाहुण्यानी शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी आपले विचार व्यक्त करून शाळा प्रारंभोत्सव कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अतिथी शिक्षिका सौ. मुक्ता नंद्याळकर यानी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta