खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसापासुन खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे, मुघवडे, कबनाळीसह अनेक भागात उन्हाळी पिक म्हणून वायंगण भात पिकाचे उत्पन्न शेतकरी घेतात.
नुकताच झालेल्या वादळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला.
याची पाहणी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी मुघवडे निलावडे, कबनाळी गावच्या शिवारात प्रत्यक्ष भेट देऊन जवळून परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी मुघवडे शिवारात कापलेले वायंगण भात वादळी पावसाने पूर्ण पाण्याखाली गेल्याने भाताला कोंब आले. त्याचबरोबर वायंगण भाताची मळणी पावसात सापडल्याने मळणी केलेल्या भाताला कोंब आले. त्यामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यावेळी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी येथील शेतकरी वर्गाशी चर्चा करून संबंधित भात नुकसानीबद्दल नाराजी व्यक्त करून कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून तसेच तहसीलदाराना भेटून शेतकऱ्याला वायंगण भात पिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अधिकाऱ्यांना भेटून करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मुघवडे, निलावडे, कबनाळी भागातील शेतकरी शंकर बिटगीरीकर, चंद्रकांत चिखलकर, रमांकात नाईक, विजय चिखलकर, महादेव कुब्रळकर, बंडू भट्ट आदी शेकडो शेतकऱ्यांच्या वायंगण भात पिकाचे नुकसान झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta