खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच दहावीचा निकाल लागला असून खानापूर येथील मराठा मंडळ संस्थेच्या ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थीनी कुमारी संजना नारायण घाडी हिने मराठी विभागातून 621 गुण (99.36) तालुक्यात प्रथम तर कु. अर्चना एन. पाटील हिने 608 गुण घेऊन व्दितीय आली आहे. कन्नड माध्यमची विद्यार्थीनी कु. प्रियांका पी. देवलतकर हिने 617 गुण (98.72) हायस्कूलच्या कन्नड माध्यमातून प्रथम आली.
ताराराणी हायस्कूलच्या एकूण 155 विद्यार्थीनी पैकी 144 विद्यार्थीनी पास होऊन शाळेचा निकाल 93 टक्के लागला.
त्याचबरोबर शाळेमध्ये चौथ्या क्रमांकावर संजना मोरे व सृष्टी देसाई यांनी 603 गुण मिळविले. तर पाचव्या क्रमांकावर ओमश्री सनदी हिने 601 गुण घेऊन यश संपादन केले.
शाळेच्या 20 विद्यार्थीनींनी विविध विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत.
विशेष श्रेणीत 23 मुली, प्रथम श्रेणीत 65 मुली, व्दितीय श्रेणीत 52 मुली तर पास श्रेणीत 4 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थीनींना संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले असून हायस्कूलचे मुख्याध्यापक राहूल जाधव व सर्व शिक्षक वर्गाचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
तालुक्यातून ताराराणी हायस्कूलचे अभिनंदन होत आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …