खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी व मणतुर्गा गावची प्रियांका पुंडलिक देवलतकर हिने दहावीच्या परीक्षेत ६१७ मार्क (९८.७२) घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला.
त्यामुळे मणतुर्गा गावाचे नाव तालुक्यात प्रसिध्द केले. म्हणून भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांच्याहस्ते प्रियांका पुंडलिक देवलतकर हिचा शाल, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
मणतुर्गा सारख्या खेडेगावची कन्या हिने ताराराणी हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन दहावीच्या बोर्ड परीक्षेत गुण ९८.७२ टक्के घेऊन पास झाली. तिच्या यशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
जिद्द, अभ्यासाची आवड, सतत कष्ट करण्याचा सवय यामुळे तिला हे यश मिळाले असे मत खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील, नागेश देवकरी, सागर देवकरी, झेवियर पिंटो तसेच प्रियांकाचे आई, वडिल व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेक्रेटरी गजानन पाटील यानी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta