खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत -जांबोटी महामार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण तसेच सीडी आदी कामासाठी २५ कोटीचे अनुदान मंजुर करून सार्वजनिक बांधकाम खात्याने काम पूर्णत्वाकडे नेले आहे.
मात्र खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील रस्त्याच्या सीडीचे काम अद्याप झाले नव्हते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे येथे पाणी साचुन वाहनधारकांची तसेच प्रवाशांची गैरसोय होत होती.
याची दखल घेऊन पीडब्लूडी खात्याचे सहाय्यक इंजिनिअर श्री. भरमा यांनी जांबोटी क्राॅसवरील रस्त्याच्या सीडीचे काम सुरू केले.
येथे पाईपलाईन टाकण्यात आली असुन गटारीचे पाणी तसेच रस्त्यावर येणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून दिली.
गेल्या दोन दिवसापासून या कामाला सुरूवात झाली आहे.
सीडीचे काम पूर्ण करून खानापूर जांबोटी मार्गावरील वाहतुक सुरळीत करून दिली आहे.
गेल्या कित्येक दिवसापासुन खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीची प्रतिक्षा प्रवासी वर्गातुन होत होती.
ही समस्या दुर झाल्याने सर्व थरातुन समाधान पसरले आहे.
येत्या पावसाळ्यात खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीची सोय झाल्याने पावसाळ्यात होणार त्रास प्रवाशी तसेच वाहनधारकांना होणार नाही, असे मत खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटेनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी बोलताना सांगितले.