Sunday , July 26 2026
Breaking News

आंबा महोत्सवास उत्साहात प्रारंभ

Spread the love

बेळगाव : शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करता यावी याकरिता बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाला आजपासून बेळगावात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. आज सकाळी आयोजित या आंबा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी फीत कापून आंबा महोत्सवाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, सोमशेखर हुळ्ळोळी आदींसह आंबा उत्पादक शेतकरी व बागायत खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महोत्सवातील प्रदर्शनार्थ मांडण्यात आलेल्या आंब्यांची माहिती घेऊन तेथील स्टॉल्सना भेटी दिल्या.


शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून सुरू झालेला हा आंबा महोत्सव येत्या 29 मेपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे बेळगाव जिल्ह्यासह विशेष करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड आणि मालवण येथील हापूस व पायरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग दर्शविला आहे.
त्यामुळे बेळगावकरांना कोकणातील हापूस आणि पायरी आंब्याची चव चाखता येणार आहे. बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग आयोजित या महोत्सवात देवगड हापुस, रत्नागिरी हापुस, पायरी, बिटक्या, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, दूधपेढा, गोवा मानखूर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम, रत्ना, शुगर फ्री आदी 25 प्रजातींचा आंबा उपलब्ध आहे.
सदर आंबा महोत्सवामुळे आंबे खवय्यांना ह्युम पार्क येथे एकाच छताखाली विविध जातींचे आंबे खरेदी करता येणार आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा आंबा महोत्सव झाला नव्हता.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *