खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूलच्या विद्यार्थीनी प्रनिषा चोपडे हिने एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मराठी विभागातून 99.36 टक्के मार्क घेऊन तालुक्यात प्रथम आली.
तसेच अमुल्या कुलम हिने 97.12 टक्के गुण मिळविले, तर प्रांजल पाटील हिने 96.80 टक्के गुण मिळविले असल्याने त्यांचा सत्कार इदलहोंड ग्रामपंचायतीच्या वतीने सभागृहात नुकताच करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष चांगापा बाचोळकर होते. तर कार्यक्रमाला उपाध्यक्षा रेखा गुरव, सदस्य उदयराव पाटील, यल्लापा होसुरकर, परशराम कुंभार, भोमाणी यळ्ळूरकर, सदस्या लक्ष्मी सुतार, माया कुंभार, सुमन कोलकार, वैशाली धबाले, लक्ष्मी नाईक, तसेच पीडीओ बळीराम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पीडीओ बळीराम देसाई यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तर अध्यक्ष चांगापा बाचोळकर यांच्याहस्ते तसेच सदस्यांच्या हस्ते विद्यार्थीनी प्रनिषा चोपडे, अमुल्या कुलम, प्रांजल पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व नोटबूक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायतीचे कर्मचारीवर्ग व नागरीक, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta