Monday , September 21 2026
Breaking News

अनगोळ येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

बेळगाव : रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

कौटुंबिक कलहातून त्यांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. महावीर चींनाप्पा सुपण्णावर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

यावेळी अनगोळ शिवारामध्ये काही शेतकरी सकाळच्या सत्रात शेतीकामे करण्याकरीता जात असताना त्यांनी महावीर यांचा मृतदेह झाडाला लटकताना पाहिला. यावेळी त्यांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर ही बातमी अनगोळ भागात वार्‍यासारखी पसरली. सदर मृत्यू झालेल्या महावीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून मृतदेह शवचिकित्सासाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *