खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे रोजी राजा शिवस्मारक येथे बोलाविण्यात अली आहे.
या बैठकीत 1 जून रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे, आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणूका संदर्भात चर्चा करणे, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सीमाप्रश्न उच्चधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणे तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत एकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे विभागवार बैठका घेण्यासंदर्भात चर्चा करणे आदी विषयांवर विचार विनिमय करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व समितीप्रेमी नागरिक, विविध संघटना कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आव्हाहन समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta